पुणे – कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून लष्कर परिसरात लागू केलेल्या लॉकडाऊनची बंधने टप्प्याटप्प्याने शिथिल केली जात आहेत. याच अनुषंगाने आता परिसरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाईच्या दुकानांना “टेक अवेश आणि होम डिलिव्हरीची सुविधा देण्यासाठी बोर्डातर्फे मंजुरी देण्यात आली आहे.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर परिसरात लागू केलेल्या लॉकडाऊनची बंधने टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी या संदर्भातील नोटीस जाहीर केली आहे. त्यामुळे लष्कर परिसरातील हॉटेल व रेस्टॉरंट चालक आणि मिठाई विक्रेत्यांना दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, परिसराच्या मध्यवर्ती भागातील सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केटमधील गाळेही सम-विषम पॅटर्नप्रमाणे सुरू करावेत, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.