मुंबई – अलीकडेच हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप सिंगर रिहानाने गुड न्यूज दिली आहे. रिहाना दुसऱ्यांदा आई झाली आहे. रिहानाने मुलाला जन्म दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, रिहानाने लॉस एंजेलिसमध्ये 3 ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला. रिहानाने मे 2022 मध्येच पहिल्या मुलाला जन्म दिला. आणि जानेवारी 2022 मध्ये तिने एका फोटोशूटद्वारे तिच्या गरोदरपणाची घोषणा केली.
रिपोर्ट्सनुसार, रिहाना आणि तिचा प्रियकर A$AP रॉकीचे पालक झालेत. असे सांगितले जात आहे की रिहानाला तिच्या मुलाचे नाव ‘आर’ ठेवायचे आहे. मुलाच्या नावाबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. त्याचवेळी, रिहानाला आपल्या मुलाचे नाव तिच्या आईच्या नावावर ठेवायचे आहे. अशीही चर्चा सध्या सुरु आहे. पहिल्यांदा आई झाल्यानंतरही रिहाना आणि रॉकीने जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रिहानाने तिच्या पहिल्या मुलाचे नाव RZA ठेवले आहे. रिहानाने हे नाव रॅपर आणि निर्माता रॉबर्ट फिट्जगेराल्ड डिग्ज यांच्या नावावर ठेवले आहे.
रिहाना एक हॉलिवूड पॉप सिंगर आहे. रिहाना बार्बाडोसची आहे. तिचे पूर्ण नाव रॉबिन रिहाना फेंटी आहे. रिहानाने तिचा पहिला संगीत अल्बम ऑफ द सन आणि अ गर्ल लाइक मी 2005 मध्ये रिलीज केला. रिहानाच्या नावावर 6 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. तिला 9 ग्रॅमी पुरस्कार, 13 अमेरिकन संगीत पुरस्कार आणि 12 बिलबोर्ड संगीत पुरस्कार देखील मिळाले आहेत. फोर्ब्सच्या अहवालानुसार, रिहानाची एकूण संपत्ती $1.7 दशलक्ष आहे. विशेष म्हणजे, रिहाना आणि A$AP रॉकी 2013 मध्ये डायमंड टूर दरम्यान जवळ आले होते. बरेच दिवस मैत्री राहिल्यानंतर दोघांमध्ये नातं निर्माण झालं.