#HockeyIndia : चिंगलेनसाना, सुमीतचे पुनरागमन तर रमणदीपला वगळले

नवी दिल्ली : अनुभवी मध्यरक्षक चिंगलेनसाना आणि आकम्रक मध्यरक्षक सुमीत यांचे दुखपातीतून सावरत मोसमाच्या सुरूवातीला होणा-या एफआयएच हाॅकी प्रो-लीगसाठी नेदरलँड्सविरूध्दच्या लढतीसाठी भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर रमणदीपला संघातून वगळण्यात आले आहे.

आकम्रक मध्यरक्षक मनप्रीत सिंह याच्याकडे संघाची कर्णपदाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे तर हरमनप्रीत सिंह या युवा खेळाडूकडे उपकर्णधार पदाची धूरा सोपविण्यात आली आहे. तर वरूण कुमारच्या जागी बीरेन्द्र लाकडा याचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

प्रो-लीगमधील पहिल्या टप्प्यात भारतीय संघ नेदरलँण्ड विरूध्द भुवनेश्वर येथे १८ आणि १९ जानेवारी २०२० दरम्यान सामना खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ८ आणि ९ फेब्रुवारीला बेल्जियमविरूध्द आणि २१ ते २२ फेब्रुवारीला आॅस्ट्रेलियाविरूध्द खेळणार आहे.

भारतीय संघ : मनप्रीत सिंह (कर्णधार), विवेक सागर प्रसाद, चिंगलेनसाना सिंह, नीलकांत शर्मा, सुमित, हरमनप्रीत सिंह (उपकर्णधारं), गुरिंदर सिंह,अमित रोहिदास,सुरेन्दर कुमार,बीरेन्द्र लाकड़ा, रूपिंदर पाल सिंह,कोथाजीत सिंह, गुरजंत सिंह, एसवी सुनील, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंह, आकाशदीप सिंह, गुरसाहिबजीत सिंह, गोलरक्षक पीआर श्रीजेश व कृष्ण बहादुर पाठक.

 

Leave A Reply

Your email address will not be published.