शाहू महाराज समाधी स्थळाची महापौरानी घेतली आढावा बैठक

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने सीवॉर्ड, नर्सरीबाग, सिध्दार्थनगर येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे इच्छेनुसार बांधण्यात आलेल्या समाधी स्थळाचा लोकार्पण सोहळा रविवार 19 जानेवारी 2020 रोजी साजरा करण्यात येत आहे.
या लोकार्पण सोहळयाच्या तयारीबाबतची आढावा बैठक महापौर ऍ़ड. सुरमंजिरी लाटकर यांनी महापालिकेचे पदाधिकारी आणि स्मारक समिती सदस्यांची घेतली.महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजिरी लाटकर यांनी बोलताना हा सोहळा गुरुवार दि.16 जानेवारी 2020 पासून साजरा केला जाणार आहे. यासाठी या चार दिवसामध्ये विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनाची विविध अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याप्रमाणे त्यांनी कामकाज करणेच्या सूचना महापौरांनी दिल्या.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी समाधीस्थळी कार्यक्रमाचा मंडप उभारणीची काम सुरु असल्याचे सांगितले.
महापालिकेच्या प्रत्येक विभागप्रमुख यांचेवर विविध कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरामध्ये जास्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमाची माहिती होण्यासाठी महापालिकेच्या होर्डिंग्जवर या कार्यक्रमाची व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करणेत येईल.
या कार्यक्रमाच्या काळात शहरामध्ये महापालिकेची रितसर परवानगी घेऊन होर्डिग्ज लावावेत. त्यावर कोणत्याही व्यक्ती, संघटना यांची नांवे न लिहता केवळ रा.छ.शाहू महाराजांचे फलक लावावेत असे आवाहन आयुक्तांनी केले.
हा लोकार्पण सोहळा जिल्हयाचा उत्सव असून यासाठी तालीम संस्था, तरुण मंडळे व नागरीकांनी मोठय प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर ऍ़ड.सौ.सुरमंजिरी लाटकर यांनी केले आहे.
या बैठकीला आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, विरोधी पक्षनेता विजय सुर्यवंशी, नगरसेवक भूपाल शेटे, जयंत पाटील आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.