डसेलडर्फ : पुरूष हॉकी संघ विजयी सलामी देत असताना भारताच्या महिला संघाला मात्र, सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाला यजमान जर्मनीकडून 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला.
दुसऱ्या सामन्यात जर्मनीच्या अमेली वॉर्टमनने 24 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. या विजयासह जर्मनीने चार सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, जागतिक महिला हॉकी संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जर्मनीने चार सामन्यांच्या हॉकी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघावर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या पराभवामुळे भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव झाला आहे.