जयंत पाटलांपाठोपाठ मुलालाही करोना

सांगली – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ पुत्र प्रतीक पाटील यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. प्रतीक पाटील यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनाही करोनाची लागण झाली होती.

“माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार मी घरी विलगीकरणात आहे, काळजी नसावी,’ अशी माहिती प्रतीक पाटील यांनी दिली आहे. तसेच करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहनही प्रतीक पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांना 18 फेब्रुवारीला करोनाची लागण झाली होती. जयंत पाटील हे सध्या मुंबईत होम क्वारंटाईन आहे. त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर आता प्रतीक पाटील यांनाही करोनाची लागण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.