पौड – महावितरणच्या हाय व्होल्टेज तारेला हायवा डंपरच्या मागील हौदा लागल्यामुळे चालकाचा मृत्यू झाल्याची घटना मुळशी तालुक्यातील भुकूम मध्ये झाली आहे. संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कुलदीप कुमार वर्मा (वय ३०, मूळ रा.झारखंड,सध्या रा मारुंजी नेरे रोड ता. मुळशी) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे. सदरचा हायवा डंपर (एम एच १२ व्ही डब्लू ९९८६) हा बालेवाडी येथुन मटेरियल घेवुन येथील बांधकाम साईट वर मटेरियल घेवुन आला होता.
हौदा वरून गेलेल्या उच्च विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला लागल्याने गाडीच्या लोखंडी बॉडी मध्ये विद्युत प्रवाह निर्माण होवून त्याला शॉक बसला.तातडीने सहकाऱ्यांनी जवळील खाजगी रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरांनी मयत झाले असल्याचे सांगीतले.
यामुळे भूगाव आणि भुकूम परिसरातील लाईट दोन तास बंद होती. महावितरण अधिकारी मुळशी उपअभियंता आनंद घुले ,दिपक चव्हाण यांनी तातडीने परिस्तिथी हाताळून विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत केला. पुढील तपास पौड पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप चव्हाण करत आहेत.