बगदाद – इराकमधील अमेरिकेच्या दूतावासाच्या दिशेने इराकने आज रॉकेटचा मारा केला. रविवारी पहाटेच्या सुमारास हा हल्ला झाला. अमेरिकेच्या वास्तूवरील हा सर्वात अलिकडील या हल्ला आहे.
इराकच्या हद्दीतील आंतरराष्ट्रीय पट्टयात या लहान रॉकेटचा मारा झाला. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे संयुक्त फौजांचे प्रवक्ते मिलेस कॅग्गीस यांनी सांगितले. “युनियन 3′ नावाच्या यातळावर संयुक्त फौजांचे सैनिक 2014 पासून इस्लामिक स्टेटविरोधातील कारवाईसाठी तळ ठोकून आहेत.
एकूण तीन रॉकेट अमेरिकेचा दूतावास आणि युनियन-3 व्यतिरिक्त इराक सरकारच्या काही इमारती आणि संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांची कार्यालये आणि अन्य दूतावासही आहेत. या ग्रीन झोनमध्ये डागली गेली. चौथे रॉकेट शेजारील हॅशेद अल शाबी या लष्करी तळावर पडले, असे इराकी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हॅशेडकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. या रॉकेट हल्ल्याबद्दल अमेरिकेने कट्टरवादी गटांना जबाबदार धरले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून या दूतावासावर 19 वेळा रॉकेट हल्ला झाला आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये अमेरिकेचा एक कंत्राटदार ठार झाला होता. या दूतावासाच्या परिसरामध्ये अमेरिकेच्या आणि स्थानिक सुरक्षा दलांच्या 5,200 सैन्याचा डेरा आहे. आजच्या रॉकेट हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नाही.