चिंबळी- ट्रिपल हिंद केसरी हरियाणाच्या अजय कुमारला काही क्षणात ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विजय चौधरी याने अस्मान दाखवत “काळभैरवनाथ केसरी’चा किताब मिळवला. चिंबळी येथे काळभैरवनाथ महाराज यात्रा उत्सवानिमित्त निकाली कुस्त्यांच्या आखाड्यात सुमारे 200 मल्लांनी सहभाग घेतला होता.
यावेळी आमदार दिलीप मोहिते भाजपाचे नेते व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख सभापती विनायक घुमटकर यांनी आखाड्याला भेट देऊन यात्रेनिमित्त सर्व ग्रामस्थाना व कुस्ती शौकीनाना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी विजय बनकर, बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, संचालक पांडुरंग बनकर, माजी उपसरपंच विश्वास बर्गे, यात्रा कमिटी अध्यक्ष हिरामण जैद, सोसायटीचे अध्यक्ष माऊली कड, कमिटीचे सचिव बाळासाहेब जाधव,
माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील-जैद, उपसरपंच चेतन बर्गे, ग्रामपंचायत सदस्य अनुराग जैद, शिवाजी कड, काळूराम बनकर, राहुल चव्हाण, गणेश सोनवणे, उद्योजक दत्तात्रय लोखंडे, तानाजी जैद, बाळासाहेब कड, राजू जाधव, अर्जुन अवघडे, शंकर टल्लू जैद, अर्जुन जाधव, हेमंत जैद, बाळासाहेब तु. जाधव, यात्रा कमिटीचे संचालक सुनिल बटवाल, अक्षय जगनाडे, अमोल बहिरट, युवराज लोखंडे, दीपक पाटोळे, प्रदीप बनकर, समीर कड, सुमीत जाधव आदी मान्यवर, ग्रामस्थ, कुस्ती शौकीन उपस्थित होते.