मुंबई – अभिनेत्री ‘नोरा फते’ही तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच नोरा बॉलिवूडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये पोहोचली, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये नोरा निळ्या रंगाच्या साडीत दिसत आहे. पण नोराच्या लूकपेक्षा तिच्या छोट्या बॅगने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
व्हिडिओमध्ये नोरा निळ्या स्लिट सिक्वेन्स साडीमध्ये दिसत आहे. या फ्युजन साडीमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत होती, ज्यासोबत तिने ब्लू मिनी हँडबॅग कॅरी केली आहे. यादरम्यान अभिनेत्रीने पापाराझींना एकापेक्षा एक पोज दिल्या. हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी तिला बॅगवरून ट्रोल करण्यास सुरुवात केली.
व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने बॅगची खिल्ली उडवली आणि लिहिले, ‘अरे ही किती छोटी बॅग आहे….’ तर दुसर्याने लिहिले, ‘विमल लहान बॅगेत असेल असे दिसते… जुबा केसरी बोला.” अश्या अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. मात्र, यावेळी नोरा अतिशय ग्लॅमर्स आणि हॉट दिसत होती.
नोरा फतेही लवकरच साजिद खानच्या 100% मध्ये जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि शहनाज देखील दिसणार आहेत. याशिवाय नोरा मडगाव एक्सप्रेस या चित्रपटातही दिसणार आहे. त्याचवेळी नोराचा ‘अच्छा सिला दिया मेरे प्यार का’ हा म्युझिक व्हिडिओ काही काळापूर्वी रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते.