मुंबई – मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi kavi) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेक वैयक्तिक अनुभव तसेच काही मजेशीर व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलही केले जाते. मात्र ती नेहमीच ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देते.
नुकतेच हेमांगी कवीने क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj singh) सोबतचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करणारी हेमांगी आता युवराज सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
हेमांगी कवी हिने युवराज सिंगबरोबर काढलेले काही फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. याद्वारे ती लवकरच युवराजसोबत काम करणार असल्याचे दिसत आहे. याबाबत तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती दिली आहे. या फोटोमध्ये ती मासे विकणाऱ्या स्त्रीच्या वेशभूषेत दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, “काय हँडसम आणि आनंदी व्यक्ती आहे!” दरम्यान, ती युवराज सिंगबरोबर एक जाहिरात शूट करणार आहे.
View this post on Instagram
हेमांगीने शेअर केलेल्या पोस्टवर ‘ग्रेट आहेस तू हेमांगी’, ‘मस्त आहे’,अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहे. तर एका नेटकऱ्याने ‘हा म्हावरा तुला कुठं गावला?’ असा सवालही केला आहे. याशिवाय अभिनेता समीर चौघुले आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील हेमांगीला शुभेच्छा दिल्या आहेत. हेमांगी कवीने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याशिवाय तिने शेअर केलेल्या फोटोद्वारे तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये तिचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोनंतर आता चाहते देखील हेमांगी आणि युवराजला एकत्र स्क्रीनवर पाहण्यास उत्सुक झाले आहेत.