Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor )’अॅनिमल’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 900कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटातील त्याचा लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘अॅनिमल’च्या यशानंतर रणबीर कपूर आता पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर सध्या रणबीर आणि रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) एकत्र फोटो व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये रणबीर कपूर पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. पोलिसांच्या गणवेशासह काळा चष्मा घातलेला रणबीर खूपच मजबूत दिसत आहे. एका छायाचित्रात त्याच्यासोबत दिग्दर्शक रोहित शेट्टीही दिसत आहे. सध्या रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट चर्चेत आहे. यात रणवीर सिंग आणि अजय देवगण सारख्या कलाकारांनी पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारली आहे. अशात रणबीरला सिंघम लूकमध्ये पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. मात्र हे रणबीर आणि रोहित एकअ चित्रपटासाठी एकत्र आले आहेत.
View this post on Instagram
एका फोटोत रणबीर खुर्चीवर बसून शॉटची वाट पाहत असतो. तर एका फोटोमध्ये रणबीर दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत फोटोसाठी पोझ देताना दिसतो. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “आरके आणि रोहित शेट्टी एका जाहिरात शूटसाठी.” सध्या या दोघांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ चित्रपटात रणबीरशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी यांच्यासह इतर कलाकार दिसले होते. रणबीर अॅनिमलनंतर आता ‘रामायण’ चित्रपटात दिसणार आहे.