मुंबई – मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी अभिनयासह तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. अनेकदा विविध विषयांवर ती सोशल मीडियाद्वारे आपले मत मांडत असते. नुकतेच हेमांगी चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेली होती. मात्र काही कारणामुळे तिला चित्रपट पाहता आला नाही. याबाबत तिने एक पोस्ट शेअर आपली व्यथा सांगितली आहे.
त्याचं झालं असं की, हेमांगी चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेली. मात्र सिनेमा थ्रीडी होता. यामुळे तिला थिएटरमध्ये काळ्या रंगाचा थ्रीडीचा चष्मा देण्यात आला होता. मात्र हेमांगीला चष्मा असल्यामुळे तिला हा गॉगल लावताना अडचण आली आणि तिची फजिती झाली. या पोस्टच्या माध्यामातून तिने वयाच्या 40 नंतर कशी अस्वस्था होते हे सांगितले आहे. याचा तिने एक व्हिडिओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत दिसते की, सुरुवातीला हेमांगी मोठ्या उत्साहात थ्रीडी गॉगल लावते. पण, चष्मा असल्याने तिला या गॉगलने काही सिनेमा पाहता येत नव्हता. मग तिने तिचा नेहमीच्या वापरातील चष्मा लावला तरी तिला सिनेमा दिसत नाही. मग, तिने शक्कल लढवत चष्मावर थ्रीडी गॉगल लावला. पण, तरी देखील काही उपयोग होत नाही. शेवटी हेमांगी प्रचंड वैतागते. ‘चाळिशीनंतरच्या अडचणी’ असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला.
https://www.instagram.com/reel/Ct3CnU6u7Hk/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
यासोबत तिने कॅप्शनमध्ये ‘दुख, दर्द, पीडा! पण काही हरकत नाही या सगळ्यापेक्षा चित्रपट जास्त त्रासदायक होता. कोणता चित्रपट होता ओळखा पाहू?’, असं लिहिले आहे. यात हेमांगीने सिनेमाचं नाव ओळखण्यासही सांगितले तेव्हा अनेकांनी ‘आदिपुरुष’ सिनेमा असल्याचे म्हंटले आहे.