Hema Malini – अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता थोडाच अवधी राहीला आहे, या निमित्याने देशभरात आनंदाचे वातावरण आहे. अशात हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अयोध्येत पोहोचून माता सीतेच्या रूपात सुंदर सादरीकरण केले. ज्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हेमा मालिनी एक उत्कृष्ट शास्त्रीय नृत्यांगना असून त्या अनेकदा आपले कौशल्य सिद्ध करतात. मात्र पहिल्यांदाच त्यांनी रामायणातील हे महत्त्वाचे पात्र साकारून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
प्राणप्रतिष्ठापूर्वी अयोध्येत रामायणाचे आयोजन करण्यात आले होते. रामभद्राचार्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये हेमा मालिनी माता सीता बनल्या. हेमा मालिनी यांनी यावेळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, “तुलसी पीठाधिश्वर (चित्रकूट जगत गुरु) श्री रामभद्राचार्य जी यांनी त्यांचा 75 वा वाढदिवस 17 जानेवारी रोजी अयोध्येत अमृत महोत्सव म्हणून साजरा केला. मला रामायण करण्याचे सौभाग्य मिळाले, ज्यामध्ये मी रामाच्या सीतेची भूमिका केली होती.”
हेमा मालिनी यांनी यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये मथुरा येथे मीराबाईच्या 525 व्या जयंती कार्यक्रमात सादरीकरण केले होते. मीराबाईवर आधारित नाटकात भाग घेऊन तिने या कार्यक्रमाची शोभा वाढवली.