Hema Malini Networth । लोकसभेचे बिगुल वाजले आहे . त्यासाठी सर्व पक्षांनी आपापले शिलेदार मैदानात उतरवलेत. त्यातच उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना उमेदवारी दिलीय. दरम्यान, काल त्यांनी आपल्या उमेदवारीचा अर्ज दर्ज दाखल केला. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती किती आहे याची माहिती समोर आलीय.
कोणताही गुन्हा दाखल नाही Hema Malini Networth ।
गुरुवारी मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या हेमा यांनी भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती सादर केलीय. हेमा मालिनी यांच्याकडे सात चारचाकी गाड्या आहेत आणि त्यांना दागिन्यांचीही प्रचंड आवड आहे. नुकत्याच केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी किंवा दिवाणी गुन्हा दाखल नाही. हेमा यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य १२९ कोटी रुपये आहे. 2019 च्या निवडणुकीशी तुलना केल्यास हेमा यांच्या संपत्तीत 4 कोटींची वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकीत त्या 125 कोटींच्या मालमत्तेच्या मालक होत्या.
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, हेमा यांच्याकडे 3 कोटी 39 लाख, 39 हजार 307 रुपयांचे दागिने आहेत. त्यांचे पती धर्मेंद्र यांच्याकडेही 1 कोटी 75 लाख 8 हजार 200 रुपयांचे दागिने आहेत. हेमा यांच्या बँकेत जमा असलेल्या एकूण संपत्तीचे मूल्य 12 कोटी 98 लाख 2 हजार 951 रुपये आहे, तर त्यांचे पती धर्मेंद्र यांच्याकडे 17 कोटी 15 लाख 61 हजार 453 रुपयांची संपत्ती आहे.
पती धर्मेंद्र यांच्याकडे जास्त कॅश Hema Malini Networth ।
प्रतिज्ञापत्रानुसार, हेमा यांच्याकडे 18 लाख 52 हजार 865 रुपये रोख आहेत, तर धर्मेंद्र यांच्याकडे 43 लाख 19 हजार 16 रुपये रोख आहेत. जमिनीच्या बाबतीत हेमा यांच्याकडे एकूण 20 लाख 91 हजार 3 हजार 360 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांचे पती धर्मेंद्र यांच्याकडे 93 लाख 67 हजार 813 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
या सर्वांशिवाय हेमा यांच्यावर 1 कोटी 42 लाख 21 हजार 695 रुपये, त्यांचे पती धर्मेंद्र यांच्यावर 49 लाख 67 हजार 402 रुपयांचे कर्ज आहे. हेमा यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर त्यांच्याकडे सुमारे 1 अब्ज 13 कोटी 60 लाख 51 हजार 610 रुपयांच्या विविध मालमत्ता आहेत. तर त्यांचे पती धर्मेंद्र यांच्याकडे 1 अब्ज 36 कोटी 7 लाख 66 हजार 813 रुपयांचा बंगला आणि इतर मालमत्ता आहे.