Dharashiv Lok Sabha Election| धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अखेर भाजप आमदार राणा जगजतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीची ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उस्मानाबाद लोकसभेतून उमेदवारी मिळवली आहे. यामुळे आता महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या समोर आता महायुतीकडून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे आव्हान असणार आहे.
येथे पुन्हा एकदा पाटील विरुद्ध निंबाळकर हा सामना पाहायला मिळणार आहे. तुळापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव अजित पवार गटाने दिला होता. मात्र राणा जगजितसिंग पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. आता त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच धाराशिवमधून त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.
कोण आहेत अर्चना पाटील? Dharashiv Lok Sabha Election|
माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांची सून आणि भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा म्हणून काम केले आहे. त्यांनी लेडीज क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यास सुरुवात केली होती. महिलांसाठी सातत्याने त्यांनी विविध उपक्रम राबविले आहे.
ओमराजेंकडून राणा जगजितसिंह यांचा 2019 मध्ये पराभव Dharashiv Lok Sabha Election|
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील यांचा सव्वा लाख मतांनी दारुण पराभव केला होता. लोकसभेनंतर राणा जगजितसिंहांनी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढले आणि तुळजापूर मतदारसंघातून ते विधानसभेवर गेले.
दीर-भावजयीमध्ये लढत Dharashiv Lok Sabha Election|
2019 च्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता पाटील घराणेकडे आहे. राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे नात्याने चुलत बंधू आहेत. मागील वेळी दोन भावांमध्ये लढत झाली होती, यंदा दीर-भावजयीमध्ये लढत होणार आहे. परंतु दांडगा जनसंपर्क असलेल्या ओमराजे निंबाळकर यांचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
हेही वाचा:
एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने घेतली शरद पवारांची भेट; साताऱ्याचा तिढा लवकरच सुटणार?