Hema Malini : बॉलीवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी यांचे आजही लाखो चाहते आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही आतुर असतात. सध्या त्या चित्रपटांपासून दूर असल्यातरी त्यांची कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चा सुरू असते. अलिकडेच त्या ‘गुलजार साहब: हजार राहें मुडकर देखें’ च्या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाला लोकांची गर्दी जमली होती. यावेळी अनेकजण हेमा मालिनी यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होते. मात्र सेल्फी काढण्यावरून त्या चाहत्यावर संतापल्याचे पाहायला मिळाले.
या इव्हेंटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये इव्हेंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यादरम्यान एक चाहता त्यांच्याकडे फोटोची मागणी करतात. पण हेमा मालिनी त्याच्यावर चिडून ‘मी इकडे फक्त सेल्फी घेण्यासाठी थोडीच आली आहे.’ त्यानंतर त्या तेथून पुढे निघून जात असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी हेमा मालिनी यांच्यावर टीका केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, या कार्यक्रमात हेमा मालिनी यांच्यासह चित्रपट निर्माते विशाल भारद्वाज, ज्येष्ठ लेखक गुलजार, यतिंद्र मिश्रा सहभागी झाले होते. गुलजार साहब यांचे हे चरित्र जे लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी आपला 75 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत पती धर्मेंद्रपासून ते बॉलिवूडचे सर्व स्टार्स सहभागी झाले होते.