मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीने धडकन, बाजीगर यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1993 मध्ये तिने ‘बाजीगर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर उचलले होते. शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असून नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांतून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते, सध्या ती इंडियन पोलीस वेब सिरीजमुळे चर्चेत आहे.
अशात शिल्पाचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी ब्लॅक अँड व्हाइट लिनियर प्रिंटेड ड्रेस घालून स्लो मोशन करताना दिसली. तिचा हा डान्स सोशलवर वायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सने या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. शिल्पाने पापाराझींसोबत मस्त करतांना दिसत आहे. फोटो क्लिक करणाऱ्या पापाराझींना शिल्पा म्हणाली,’तुमचे मन भरत नाही ना… दुसर्या पापाराझीला सांगताना – माझ्या आतला शेट्टी बाहेर येत आहे..’ असं म्हणत ती स्लो मोशन करतांना दिसत आहे.’
दरम्यान, रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स वेब सीरिज ‘इंडियन पोलिस फोर्स’चा टीझर रिलीज झाला आहे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि सिद्धार्थ मल्होत्रा पोलिसांच्या भूमिकेत दिसून येत आहे. हातात बंदूक घेऊन कारसोबत स्टंट करताना दिसत आहेत. ही वेब सिरीज 19 जानेवारीला Amazon Prime वर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.