रिक्षा चालकांच्या कुटुंबियांनाही मदतीचा हात
येरवडा(प्रतिनिधी) – येरवडा भागातील यशवंतनगर येथील धुणी-भांड्याचे काम करणाऱ्या गरजु महिलांना तसेच रिक्षा चालक व हातावर पोट असणाऱ्या गरजु कुटुंबियांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,सावित्रीबाई फुले प्रतिष्ठाण यांच्यावतीने 400 महिलांना जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आले.
जवळपास 13 वस्तुंचे वाटप करण्यात आले.यावेळी शिक्षण मंडळ माजी सदस्य राजेंद्र काटे डॉ.बाबासाहेब आंबेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गणेश शिंदे,व समितीचे संस्थापक सुर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.