- चार बंबाद्वारे आग नियंत्रणात
जाधववाडी (चिखली) – पिंपरी-चिंचवडमधील चिखली, जाधववाडीतील इंद्रायणी नदीकाठी, भैरोबा मंदिरामागे रंजन वजन काट्याजवळ सोमवारी (दि. 20) दुपारी लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. सायंकाळी सहाच्या सुमारास आग नियंत्रणात आली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील जाधववाडीमधील लाकडाच्या गोदामाला दुपारी अडीच ते तीन वाजता आग लागली. आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली.
घटनास्थळी धाव घेत अग्निशामक विभागाच्या चार बंबाद्वारे आग विझविली. सायंकाळी सहाच्या सुमारास आग नियंत्रणात आली. आगीत जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.