जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज  

रविवारी 115 मि.मी. पावसाची नोंद

नगर – हवामान खात्याकडून जिल्ह्यात सोमवार व मंगळवारी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रविवारी जिल्ह्यात 115 मि.मी पावसाची नोंद झाली. आज सोमवारी नगर शहरसह जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, संगमनेर, अकोले तालुक्‍यात पावस झाला.

नगर जिल्ह्यास धुळे व नंदुरबार जिल्ह्यात दि. 24 व दि. 25 रोजी जोरदार पावसाची शक्‍यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. अनेक भागात तुरळक सरी कोसळल्या. शनिवारी रात्री कोपरगाव तालुक्‍यात झालेल्या जोरदार पावसाने दाणादाण उडाली.

जिल्ह्यातील बहुतांश भागात रविवारी रात्री पाऊस झाला. आज दिवसभर पावसाळी वातावरण तयार झाले असून हवेत गारवा निर्माण झाला आहे. रविवारी जिल्ह्यात संगमनेर, कोपरगाव, नेवासे, राहाता वगळता अन्य तालुक्‍यात पावसाने हजेरी लावली. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मि.मी मध्ये अकोले- 5, श्रीरामपूर- 1, राहुरी- 2.6, नगर- 5, शेवगाव- 27, पाथर्डी- 30, पारनेर- 2, कर्जत- 7, श्रीगोंदा- 11, जामखेड- 25 .

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.