पुणे – पुणे शहरात रात्री नऊ वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील मध्यवर्ती भाग नारायण पेठ, सदाशिव पेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा, कर्वेनगर या उपनगरात देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक पावसाला सुरूवात झाल्याने पुणेकरांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने रात्री 11 वाजून 20 मिनिटांपर्यंत पाऊस सुरु राहणार असल्याची माहिती दिली आहे.
पुणे शहरात मुसळधार पाऊस, pic.twitter.com/2sP7pgucCd
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 17, 2022
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुणे, पिंपरी चिंचवड आणि लगतच्या क्षेत्रावर 9 ते 11 किमी उंचीचे ढग सक्रिय आहेत. पावसाचा जोर पुढील तासभर राहण्याची शक्यता आहे. सखल भागांत, रस्त्यांवर पाणी साचणे, फ्लॅश फ्लड, झाडे पडणे, अशा घटना घडू शकतात, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत आहे. नागरिकांनी पाऊस थांबल्यानंतर काही वेळाने प्रवास करावा..