कोलकाता- भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मपासून वंचित रहावे लागल्याने मला धक्का बसला आहे असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. उत्तर बंगालच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी म्हणाल्या की, गांगुली आता आयसीसी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत.
त्यांना ही निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यासाठी पंतप्रधानांकडे विनंती करणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सौरवने स्वत:ला एक सक्षम प्रशासक असल्याचे सिद्ध केले आहे आणि त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवल्याने मला धक्का बसला आहे. हा त्यांच्यावर झालेला अन्यायच होता असे मतही ममतांनी व्यक्त केले आहे. या विषयावर कोणतेही राजकारण होऊ नये, असेही बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.