मुंबई – मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. ठाणे, नवी मुंबईसह परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) मुंबईत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. पुढचे चोवीस तास आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटद्वारे दिली आहे.
The city is expecting intermittent heavy showers all through the night. We request commuters to not venture in water logged areas and also request you all to maintain distance from the sea. Please tweet to us or call on 100 in any emergency/need of help. Take care #MonsoonSafety
— Mumbai Police (@MumbaiPolice) July 26, 2019
दरम्यान, आज पहाटेपासून सुरु झालेल्या संततधारेमुळे मुंबईतील सायन, दादर, माटुंगा, वडाळा, अंधेरी, कुर्ला, कांदीवली, जेव्हीएलआर परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात वाहतूकीवर मोठा परिणाम होत आहे.