सॅन फ्रान्सिस्को- अमेरिकेच्या पश्चिमेकडील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे वणवा भडकला आहे. उत्तर कॅलिफोर्नियातील काही भागांमध्ये हा वणवा भडकला आहे आणि ही आग विझवण्यासाठी फायर फायटर झगडत आहेत.
या वणव्यामुळे मोठ्या वनसंपदेची राख रांगोळी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अग्नेय कॅलिफोर्नियातल्या डेथ व्हॅलीमधील मोजावी डेजर्टमधील तापमान शनिवारी 53 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले होते. मात्र आदल्याच दिवसापेक्षा तापमान यापेक्षा कमी होते. आदल्या दिवशी तापमान 54 अंश सेल्शियस इतके होते, ही एक आश्चर्याची गोष्ट आहे.
जुलै 1913 मध्ये येथील तापमान 57 अंश सेल्शियस इतके नोंदवले गेले होते. तो दिवस पृथ्वीवरील आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस असल्याचे मानले जात होते.
कॅलिफोर्नियाच्या वायव्येकडे 300 मैल अंतरावरील वाळवंटी प्रदेशात नेवाडा प्रांताच्या सीमेजवळ हा वणवा भडकला आहे. लेक ताहो या ? वीज पडल्यामुळे हा वणवा भडकला होता.
सिएरा नवादा येथसर्यंत हा वणवा पोहोचण्याची कोणतीही शक्यता दिसत नव्हती. मात्र शनिवारी संध्याकाळी या वणव्याने रौद्र रुप धारण केले आणि तो राज्यांच्या सीमा ओलांडून पसरू लागला. त्यामुळे नवाडातील वॉशॉ कौंटीतील मालमत्तांना धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत हा वणवा 86 चौरस मैलांपर्यंत पसरला आहे.