अथेन्स – ग्रीसमध्ये सतत येत असलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे शास्त्रज्ञांनी या उष्णतेच्या लाटांचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमी ज्याप्रमाणे वादळांना नावे दिली जात असतात, त्याचप्रमाणे या उष्णतेच्या लाटांचेही नामकरण केले जाणार आहे.
जगभरात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटांमुळे वणवे भडकले आहेत. या उष्णतेच्या लाटा तापमानवाढीचाच परिणाम आहेत. या उष्णतेच्या लाटांचे प्रमाण माजणे आणि त्यांची तीव्रता देखील तपासली जाणार आहे.
त्यासाठी या उष्णतेच्या लाटांची स्वतंत्र ओळख असणे गरजेचे आहे. म्हणूनच शास्त्रज्ञांनी या उष्णतेच्या लाटांचे स्वतंत्र नामकरण होणे गरजेते आहे. यामुळे वणवे भडकण्याच्या समस्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी काही उपाय योजना करताना त्यांचा उल्लेख करणे सोपे होणार आहे.
जून महिन्यापासून घ्रीसमध्ये उष्णतेच्या दोन मोठ्या लाटा आल्या आहेत. या आठवड्यापासून राजधानी अथेन्सच्या वायव्येकडील भागात पुन्हा एकदा भीषण उष्णतेची लाट पसरायला लागली आहे.
या उष्णतेच्या लाटांना आतापर्यंत कमी कलेखले गेले आहे. त्यामुळेच त्यांची स्वतंत्र दखल घेतली गेलेली नाही, असे ग्रीसमधील नॅशनल ऑब्जव्हेटरीचे संचालक संशोधक कोत्सा लागोव्हदोस यांनी सांगितले. या उष्णतेच्या लाटांपासून नागरिकांनी स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठीच त्यांची स्वतंत्र ओळख गरजेची आहे, असे ते म्हणाले.