Manoj Jarange Patil – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाच्या बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी अखेर काल नवव्या दिवशी मंत्रिमंडळ समितीच्या शिष्टाईनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. बेमुदत उपोषण मागे घेतले असले तरीही त्यांनी आंदोलन मागे घेतलेले नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.
यानंतर, मनोज जरांगे-पाटील यांना अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढी दीर्घ काळ उपवास केल्यामुळे जरांगेंची तब्येत खालावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जरंगे यांच्या किडनी लिव्हरवर सूज आली असल्याची माहिती समोर आली आहे. मागीलवेळी १६ दिवस त्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर आता केलेल्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे.
आता मागील उपोषणापेक्षा सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. डॉक्टरांनी सांगितले की,’सतत केलेल्या उपोषणामुळे यावेळी त्यांना अधिक त्रास झाला आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे.