कोथरूड – चार दिवसांचा रोजगार बुडतो म्हणून ऊसतोड महिला कामगार आपलं गर्भाशय काढून टाकतात, हा विषयच फार गंभीर आहे. तो अभ्यासपूर्ण आणि नेमक्या पद्धतीने मांडणे हे खरं कौशल्य आहे, असे मत महाराष्ट्र कौन्सिल आणि इंडियन मेडिकल कौन्सिलच्या एक्झिक्युटिव्ह मेंबर अनुपमा शिंपी यांनी व्यक्त केले.
कोथरूड येथे फोर के फिल्म्स प्रॉडक्शन आणि एमएन तातुसकर क्रीएटिव्ह मीडिया प्रॉडक्शन निर्मित “झांबड’ या लघुपटाचे उद्घाटन पार पडला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी, अनुपमा शिंपी, राजेंद्र कापसे उपस्थितीत होते.
लेखक प्रेम सावंत, दिग्दर्शक धनेश कुलकर्णी आणि मयूर तातुसकर यांनी लघुपटाद्वारे सामाजिक प्रश्नाबद्दलची संवेदनशीलता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले. युवा दिग्दर्शकाने एका अतिशय संवेदनशील सामाजिक विषयाला हात घातला आहे, असे मत मेघराजराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी महेश पाटील, श्रद्धा संजय गायकवाड, अण्णा लोंढे, मनोज चौधरी, अमृता चिदरी, माऊली पुराणे, धनेश कुलकर्णी, प्रेम सावंत, मयुर तातुसकर, प्रवीण वाघमारे तसेच अमित चिंचणकर, यशवंत कांबळे, समीर आठले, अभिजीत गायकवाड, मंगेश वाघ, प्रभावती शेकोकर, हनुमंत इंचुरे, हेमंत गुजराथी उपस्थित होते.