पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या दहा जणांना कोथरुड भागात गुन्हे शाखेने पकडले. उजवी भुसारी काॅलनी परिससरातील एका इमारतीत ही कारवाई करण्यात आली.
मुकेशकुमार साहू (वय २४), देवेंद्र यादव (२१), जसवंत साहू (२२), राहुलकुमार यादव, रोहितकुमारयादव (२६), दुष्यंत सोनकर (२३), संदीप मेश्राम (२१), अखिलेश ठाकूर (२४), मोहंमद सौदागर (३२), अमित शेंडगे (३२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आरोपी साहू, यादव, सोनकर, ठाकूर, मेश्राम मूळचे छत्तीसगडचे आहेत. याबाबत खंडणी विराेधी पथकाचे सहायक फाैजदार प्रवीण ढमाळ यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या सट्टेबाजीची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथून लॅपटाॅप आणि मोबाइल संच असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील तपास करत आहेत