उद्योजक देवेंद्र भाट यांचा उपक्रम
मांजरी: यंदाचा स्वातंत्र्यदिन हा संपूर्ण भारतभर अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. केशवनगर येथील युवा उद्योजक पुणे कॅन्टोंमेंट बँकेचे आणि मातोश्री डेव्हलपर्सचे संचालक देवेंद्र भाट यांनी या विशेष दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
गायरान वस्ती येथे नगरसेविका पूजा कोद्रे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर कोविडच्या काळात आपली व आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता समाजासाठी ” करोंना योद्धा ” बनून कार्य केलेल्या सागर भंडारी , डॉ. लालसाहेब गायकवाड , अकबर पठाण , प्रवीण प्रधान यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रूपा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेस रोख अकरा हजार रुपये देणगी देण्यात आली.
परिसरातील गुणवंत विध्यार्थ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. तसेच कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या शालेय विध्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूक संघटनेच्या कर्मचाऱ्यांना तसेच आशा वरकर्सना धान्य वाटप करण्यात आले.
नगरसेविका पूजा समीर कोद्रे,संजय गायकवाड, दिलीप व्यवहारे, अशोक येवले, शक्ति प्रधान, मुकुंद माने , ज्येष्ठ नागरिक संघाचे सखाराम भोसले, अशोक भंडारी, नयनेश शिनलकर, रवी गागडे,रमेश राऊत, मोहन गागडे, उमेश टापरे , बंडू हरीहर, अशोक काळे, आदित्य भाटआणि नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले तर रमेश राऊत यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल गायरान मित्र मंडळ, जेष्ठ नागरिक संघ आणि सुप्रभात ग्रुप च्या सभासदांनी परिश्रम घेतले.