मंचर- कळंब (ता. आंबेगाव) येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड मजूर कामगारांची आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली, अशी माहिती डॉ.सुहास कहडणे यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुहास कहडणे, डॉ. राजेश थोरात यांनी कळंब परिसरातील सुमारे 23 टोळ्यातील 526 ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी सोशल डिस्टन्स ठेवून करण्यात आली. ऊसतोड कामगारांची तपासणी विभागवार असोसिएशनच्या खासगी डॉक्टरांमार्फत करण्यात येणार आहे. कारखान्याच्या कामगारांचे व संचालक मंडळाचे सहकार्य मिळत आहे.ऊसतोड कामगारांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.