पिंपरी – उसने 60 रुपये देण्यास नकार दिल्याने सिमेंटच्या गट्टूने एकाला मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 5) सकाळी साडेदहा वाजता नवी सांगवी येथे घडली.
हनुमंत विश्वंभर मोटे (वय 47, रा. नवी सांगवी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी रविवारी (दि. 6) याबाबत त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहानवाज रफिक शेख (वय 29, रा. नवी सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शनिवारी सकाळी आरोपीने फिर्यादी यांच्याकडे उसने 60 रुपये मागितले. पैसे देण्यास फिर्यादी यांनी नकार दिला. त्याचा राग आल्याने आरोपीने अडीच तासानंतर येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात रस्त्यावर पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने मारून गंभीर जखमी केले.