शेतकरी आंदोलनाबाबत नवज्योतसिंह सिद्धूंचा शायरी अंदाज

नवी दिल्ली – मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीवरील शेतकरी आंदोलनाची धार आणखी तेज होत आहे. शेतकऱ्यांनी उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या हाकेला अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शविला आहे. या आंदोलनाला आता एक हत्यार मिळाले आहे, ते म्हणजे नवज्योतसिंह सिद्धू.

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आता नवज्योतसिंह सिद्धू उतरले आहे. आपल्या हरफनमौला अंदाजासाठी प्रसिद्ध असलेले सिद्धू यांनी व्हिडिओ ट्‌विट करून म्हटले की, शेतकऱ्यांचा हुंकार पूर्ण जगाला ऐकू जात आहे. त्यांनी शायरी अंदाजात म्हटले की,
‘अब तख्त गिराए जाएंगे और ताज उछाले जाएंगे।’

कॉंग्रेस नेते सिद्धू म्हणाले की, आता देशाचा खरा बहुसंख्याक आपली ताकद दाखवत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन देशातील विविधतेत एकता निर्माण करीत आहे. ही ठिणगी आहे, जी पूर्ण देशात पसरून एकतेची भावना निर्माण करीत आहे. यात सर्व जाती, धर्म, रंगरूपाचे लोक एकत्र आले आहेत.

नवज्योत सिद्धू यांनी ट्‌विट करून म्हटले की,
‘भट्ठी को दूध पर रखो, तो उसका उबलना निश्‍चित है
और किसानों में रोष और आक्रोश जगा दो,
तो सरकारो का तख्त-ओ-ताज उलटना निश्‍चित है।
दरबान-ए-वतन में जब एक सब जाने वाले जाएंगे।
कुछ अपनी कजा (मौत) को पहुंचेंगे,
कुछ अपनी सजा को पाएंगे।
ऐ खाक नशीनों उठ बैठो,
अब तख्त गिराण जाएंगे
और ताज उछाले जाएंगे।

माजी खासदार आणि कॉंग्रेसचे नेते सिद्धू यांनी शायरी आंदाजात म्हटले की,
‘चलते ही चलो,
चलते ही चलो कि अब डेरे दिल्ली में ही डाले जाएंगे।
तूफान जब झूमकर उठेगा,
तिनकों से न टाला जाएगा,
तानाशाहों से न टाला जाएगा।

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.