पिंपरी – नवी सांगवी येथील औंध रुग्णालय परिसरात झालेल्या खुनामागे अनैतिक संबंधांचे कारण असल्याचे समोर आले आहे. खून झालेल्या तरुणाचे एका आरोपीच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश जीवन खेराले (वय 40, रा. कामगार वसाहत, औंध) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरकाल जीवन खेराले (वय28) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, विशाल अशोक घोरन (वय 30), रोहित किशोर घोरन (वय 30), हितेश उर्फ गुड्डू किशोर घोरन(वय 26, सर्व रा. कामगार वसाहत, सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश याचे विशाल सोबत शनिवारी (दि.20)किरकोळ कारणांवरून भांडण झाले. त्याचा राग विशालच्या मनात होता. तसेच रोहित याच्या पत्नीशी निलेशचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्याची रोहितला कुणकुण लागली होती.
यातूनच रोहितने निलेशच्या अंगावर एकदा दुचाकी घातली होती. हा सर्व प्रकार रोहितला माहित झाला. त्याने रोहित आणि त्याचा भाऊ हितेश यांच्यासोबत मिळून निलेशला मारण्याचा कट रचला. शनिवारी मध्यरात्री तिघांनी मिळून निलेशला औंध रुग्णालयात सुप्रिडेंटच्या घरासमोर आडबाजूला नेले व तिथे डोक्यात फरशी घालून त्याचा खून केला.