व्हिडीओ कॉल करून महिलेचा विनयभंग

पिंपरी – महिलेच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर व्हिडीओ कॉल करून अश्‍लील चाळे करत विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील पाषाण येथे घडली.

याप्रकरणी 31 वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अंकुश नारायण दळवी यांच्या नावे असलेला मोबाइल (क्र.9370972004) वापरणाऱ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बुधवार (दि. 3 जुलै) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपीने फिंर्यादी महिलेच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर वारंवार व्हिडीओ कॉल करुन अश्‍लील चाळे करत विनयभंग केला. उपनिरीक्षक गोविंद पवार अधिक तपास करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)