काय सांगता ‘रेखा’ ६५ वर्षांची झाली!

ती आली, तिने पाहिले, तिने जिंकून घेतले सारे… अन आजही ती जिंकतेच आहे जनमानसांच्या मनाला. आजही टिकून आहे ती स्पर्धेत जग जिंकणे सोप्पे नाही अन्‌ नव्हतेच कधी; मग तिच्यासाठी कसे असेल? कायम यशाच्या शिखरावर पाहात आलेल्या सिनेतारिका “रेखा’ला अनेक अडथळे पार करत, हा बॉलिवूड प्रवास जिद्दीने करावा लागला,यश खेचून आणावे लागले. सिनेतारिका, सौंदर्य साम्राज्ञी ‘रेखा’ हिच्या आज वाढदिवस आहे. बेबोने आज 65 वर्षात पदार्पण केले आहे.

तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी 

दक्षिणेत जन्मलेल्या अभिनेत्री मूळातच दिसायला सुंदर असतात. रेखाही त्यांच्यापैकीच एक! 10 ऑक्टोबर 1954 मध्ये रेखाचा तमिळनाडूतील मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) जन्म झाला. रेखाने आपल्या कारकिर्दीची सुरवात बालकलाकार म्हणून केली. 1966मध्ये ‘रंगूला रत्नम’ या तेलुगू चित्रपटात काम करून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

दाक्षिणात्य चित्रपसृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले. भानुरेखा गणेशन असे पूर्ण नाव असलेल्या रेखाने चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी रेखा हे नाव लावण्यास सुरवात केली. त्या काळी हिरोईनच्या नावांना फार महत्त्व होते. अशातच रेखा हे नाव मनामनात रूजले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on


“खून भरी मांग’ आणि “उमराव जान’ यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले. अलीकडच्या काळात तिने “कोई मिल गया,’ “दिल है तुम्हारा’ या सारख्या सिनेमांमध्ये काम करून तिच्या परिपक्व अभिनयाची चुणूक दाखवली. तिला “गांव की गोरी’ म्हणून एक वेगळी ओळख मिळाली अन्‌ त्याच धाटणीचे चित्रपट तिला मिळू लागले. अभिनयक्षमता दिवसेंदिवस प्रगल्भ होऊ लागली अन्‌ रेखा हे नाव अभिनय क्षेत्रात जोमाने कार्यरत होऊ लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on


सुंदर त्वचा आणि दाट केस यामुळे आजही कौतुकास पात्र ठरणाऱ्या रेखा त्यांच्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेतात. ज्या वयात फिटनेस सांभाळणं सर्वांना कठीण जातं. त्या वयात रेखा यांनी त्यांचा फिटनेस खूपच उत्तम प्रकारे सांभाळला आहे.

 

View this post on Instagram

 

With neetu

A post shared by Bhanurekha (@rekha_the_actress) on


रेखाचा बोल्ड अवतार संपून लांब वेणी अन्‌ साडी या सोज्वळ रूपात देखणी दिसू लागली. अभिनय, अन सोज्वळ रूप या दोन्हींमुळे रेखाला अनेक चित्रपट मिळू लागले.


आणखी एका गोष्टीमुळे रेखा नेहमीच चर्चेत राहिली ती म्हणजे तिची अनेक  लव्हलाईफ समोर येऊ लागली. रेखा अमिताभ बच्चन यांचे प्रेम विशेष चर्चेचा विषय झाला होता.

ती आजही त्याच उत्साहाने अभिनय करते. वय ही गोष्ट तिच्या आयुष्यात नाहीच जणू. ती आजही तरुण मुलींना लाजवेल असे सौंदर्य मिरवते.

Leave A Reply

Your email address will not be published.