#HBD अनुष्का शर्मा : जाणून घ्या ‘परी’विषयी

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आज ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे.

स्वबळावर सिनेसृष्टीत आपली ओळख बनवणारी अनुष्का चांगली अॅक्ट्रेस आहेच याशिवाय ती एक उत्तम फिल्म निर्मातीही आहे. अनुष्का शर्माचा जन्म उत्तरप्रदेशमधील अयोध्येत १ मे १९८८ साली झाला. तिचे वडील आर्मी ऑफिसर कर्नल अजय कुमार शर्मा आहेत. 

अनुष्काला लहानपणापासूनच मॉडलिंग आणि फॅशनची आवड होती. 

अनुष्काने १४ व्या वर्षी एका जाहिरातीत काम केले होते. यानंतर २००८ साली अनुष्काने शाहरुख खानचा ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये  डेब्यू केला.  

अनुष्का शर्माने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले असून वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. यासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळेल आहेत. 

अनुष्काने बॉलिवूडचे तीनही खानसोबत काम केले आहे. शाहरुख खान ‘रब ने बना दी जोडी’, आमिर खान ‘पीके’, सलमान खान ‘सुल्तान’ या चित्रपटामध्ये काम केले असून तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले आहेत. 

अनुष्का शर्माचे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि महागडी अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. 

अनुष्का शर्मा क्रिकेटर विराट कोहलीसोबत डिसेंबर २०१७ साली विवाहबंधनात अडकली. इटलीमधील लेक कोमो येथे अनुष्का विवाहसोहळा पार पडला. 

 

अनुष्काने सिनेसृष्टीत १० वर्ष पूर्ण केली आहेत. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.