#महाराष्ट्र_दिन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने मराठी माणसाच्या दृष्टीने या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. याच दिवशी महाराष्ट्राला स्वतंत्र ओळख मिळाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 107 हुतात्म्यांनी बलिदान दिले . 1 मे कामगार दिन म्हणुनही साजरा केला जातो.

महाराष्ट्र दिनानिमित्त आज सकाळी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व हुतात्म्यांच्या स्मृतिस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले..

 

तसेच महाराष्ट्र राज्य स्थापनादिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन आणि संचलन कार्यक्रमाला सकाळी शिवाजी पार्क, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मा. राज्यपाल सी. विद्यासागर राव हे देखील उपस्थित होते.

मुंबई महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. राज्यपाल सी. विद्यासागरजी राव, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती होती. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर देखील उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील हे आणखी काही क्षण….

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.