fbpx

आणखी एका बलात्काराने हाथरस हादरले

हाथरस (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशमधील हाथरस आणखी एका बलात्काराच्या प्रकरणाने चर्चेत आले आहे. तेथे एका नऊ आणि 12 वर्षाच्या मुलांनी एका चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला. पोलिसांनी या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे.

या मुलीच्या वडिलांनी एफआयआर नोंदवल्यानंतर हाथरस जंक्‍शन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही दोन मुले याच गावातील असून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

19 वर्षीय दलित युवतीवर बलात्कार करून तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात तिचा चौदा दिवसांनी मृत्यू झाल्यानंतर हाथरस देशभर प्रकाशझोतात आले होते. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने त्याची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.