सराईत सोनसाखळी चोरटे गजाआड ; 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल

पुणे- हडपसर पोलिसांनी घरफोडी व सोनसाखळी चोरीतील 20 पेक्षा अधिक गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत चोरट्यास अटक केली. अजयसिंग अर्जुनसिंग दुधाणी (वय.20,रा.मांजरी बुद्रुक), सुरजसिंग राजपालसिंग टाक (वय.30,रा. बिराजदार नगर हडपसर) अशी दोघांची नावे आहेत.

दोघे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर 50 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हडपसर परिसरातील सात व खडकी पोलिस ठाण्याकडील एक असे आठ गुन्हे उघडकीस आनले आहेत. तसेच आरोपींच्या ताब्यातून एक दुचीाक, 195 ग्रॅम वजानाचे 5 लाख 78 हजार रुपये किंमतीचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत.

शहरातील जबरी चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हडपसर पोलिसांचे एक पथक गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस नाईक नितीन मुंढे यांना बातमी मिळाली होती की, दोन अनोळखी व्यक्ती मगरपट्टा ओवरब्रिज खाली दुचाकीवर आले असून, त्यांच्याकडील सोन्याची साखळी विक्री करण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक सैरभ माने, कर्मचारी नितीन मुंढे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, अकबर शेख, शाहीद शेख, शशिकांत नाळे, प्रशांत टोणपे, निखील पवार, समीर पाणडोळे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, हडपसर, मांजरी, फुरसूंगी,वाकडेवाडी परिसरात चोरी केल्याचे समोर आले.

तब्बल तेरा गुन्हयात वॉंण्टेड 
अजयसिंग दुधाणी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, तो एकूण 13 गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व शहर पोलिस आयुक्तालयात त्यांनी विविध प्रकारचे गुन्हे केले आहेत. लॉकडाऊन कालावधीत दुधाणी याने निगडी पोलिस  ठाण्याच्या हद्दीत एटीएम चोरीचा गंभीर गुन्हा केला आहे. संबधीत गुन्ह्यात जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने चोरीचे सत्र सुरूच ठेवले. अजयसिंग याचे वडील अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधाणी हा तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या मोक्काच्या गुन्ह्यात गेले अडीच वर्षापासून येरवडा कारागृहात बंदीवान आहे. तसेच त्याच गुन्ह्यात त्याचा चुलता करणसिंग हा देखील येरवडा कारागृहात आहे. तर तीन चुलते सुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.