हाथरस प्रकरण : पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून जबरदस्तीने अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा दावा

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडीत महिलेचा आज दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मध्यरात्रीच पोलिसांनी जबरदस्तीने पीडितेवर अंत्यसंस्कार केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना पीडितेच्या भावाने म्हंटले कि, अखेरचा एकदा तिचा मृतदेह घरी आणला जावा यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती करत होतो, पण पोलिसांनी ऐकले नाही. माझ्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले असे दिसत आहे. पोलिसही आम्हाला काहीच माहिती देत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

पीडितेच्या मृतदेह रात्री १० वाजता रुग्णालयातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी पीडितेच्या भावाचा आरोप फेटाळला आहे. शांती व सुव्यवस्थेसाठी आणि कुटुंबियांसोबत मध्यरात्री अंत्यसंसकार करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

याआधी पीडित तरुणीच्या वडील आणि भावाकडून रुग्णालयाबाहेर निदर्शन करण्यात आले. परवानगी न घेताच मृतदेह नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्यासोबत काँग्रेस तसेच भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

दरम्यान, पीडित तरुणी 4 सप्टेंबरला हाथरसमधील शेतातून बेपत्ता झाली होती. काही कालावधीनंतर ती गंभीर जखमी अवस्थेत सापडली होती. आरोपींनी तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिची जीभ चावली गेल्याने जीभ तुटली होती. तिच्या हात-पायांना अर्धांगवायूही झाला होता. तिला अलिगडमधील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल केले गेले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.