हरियाना : मादक द्रव्यांच्या व्यापार प्रकरणात पाचशे जणांना अटक

चंदीगड – हरियानातील सिरसा जिल्ह्यात मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार चांगलाच फोफावल्यानंतर पोलिसांनीही त्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई हाती घेतली असून गेल्या आठ महिन्यात या प्रकरणात पाचशे जणांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मादकद्रव्ये जप्त करण्यात आली आहेत. औषधी गोळ्यांच्या स्वरूपातही ही द्रव्ये विकली जात असल्याची बाब उघडकीला आली असून 2 लाख 56 हजार 332 बत्तीस मादकद्रव्यांच्या गोळ्याही या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी या प्रकरणात गेल्या काही महिन्यात 305 खटले दाखल केले असून त्यात 521 जणांना आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांवर अटकेची कारवाईही करण्यात आली आहे. हरियानाचे पोलिस महासंचालक मनोज यादव म्हणाले की ड्रग फ्री हरियाना अशी आमची घोषणा असून आम्ही या राज्याला मादकद्रव्यांच्या विळख्यातून निश्‍चीत सोडवू.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)