संजय दत्तचे वाढदिनी चाहत्यांना खास भेट

साउथमधील सुपरस्टार यशचा गतवर्षी प्रदर्शित झालेल्या “केजीएफ’ला बॉक्‍स ऑफिसवर चांगले यश मिळाले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता आणि या चित्रपटाने तब्बल 250 कोटींचा गल्ला जमविला होता. तो कन्नडमधील सुपरहिट चित्रपट ठरला होता.

चित्रपट निर्मात्यांनी आता “केजीएफ ः चॅप्टर 2’चा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केले आहे. यात खलनायकाची म्हणजे अधीराच्या भूमिकेत संजय दत्त एका वेगळा अवतारात दिसणार आहे. विशेष म्हणजे संजय दत्तच्या वाढदिनी हा लुक जारी करत चाहत्यांना ही खास भेट देण्यात आली आहे. याबाबत स्वतः संजय दत्तने ट्विटर लिहिले की, थॅंक्‍यू आणि “केजीएफ’चा हिस्सा बनल्याचा आनंद आहे. तसेच काही दिवसांनी “केजीएफ 2’च्या निर्मात्यांनी एक टिझर पोस्टर रिलीज केले होते. ज्यात अधीराची झलक पाहण्यास मिळाली होती. मात्र, स्पष्टपणे ही भूमिका कोण साकारत आहे हे दिसत नव्हते.

दरम्यान, चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशापासूनच चाहत्यांना पुढील सीक्‍वलबाबत उत्सुकता लागली होती. “केजीएफ’ प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी दुस-या भागाच्या चित्रिकरणास प्रारंभ झाला होता. “केजीएफ-2′ हा पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यात श्रीनिधी शेट्‌टी मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.