बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ट्रॅक आणि फिल्ड मैदानी स्पर्धेत भारताचा उंचउडीतील स्टार खेळाडू तेजस्वीन शंकर याने ब्रॉंझपदकाला गवसणी घातली. त्याच्या या पदकामुळे मैदानी स्पर्धेतील ट्रॅक आणि फिल्डमध्ये पहिलेच पदक मिळवून दिले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत उंच उडीत भारतासाठी पदक जिंकणारा तेजस्विन हा पहिला खेळाडू ठरला. तेजस्विनने पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत 2.22 मीटर उडी मारून ब्रॉंझपदक पटकावले.
ABSOLUTELY SPOT ON!!@TejaswinShankar bags 🥉 with his sensational jump🤩
Have a look at the winning moment 👌#Cheer4India 🇮🇳#India4CWG2022 🤟@PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @IndiaSports @YASMinistry @CGI_Bghm @afiindia @SonySportsNetwk @ddsportschannel pic.twitter.com/MFaneCta5K
— SAI Media (@Media_SAI) August 4, 2022
शंकरने तिसऱ्या प्रयत्नात 2.19 मीटर उंच उडी मारण्याचा प्रयत्न केला. तो पहिल्या प्रयत्नातच 2.19 मीटर उंच उंडी मारण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे तो पदकांच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आला होता. त्यानंतर त्याने 2.22 मीटर उंच उडी मारत आपले पदक साकार केले.