निघोज, (वार्ताहर) – निघोज परिसरातील तनपुरेवाडी (मुलिकानगर) येथे श्री गणेश जन्मोत्सव निमित्ताने दि.१२ ते दि.१४ पर्यंत वरद विनायक अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुलिकानगर व निघोज ग्रामस्थांनी दिली. कैलास महाराज येवले आळंदी, तुषार महाराज गुंड वडगाव गुंड, महंत योगी बेलनाथ महाराज भिमाशंकर, नवनाथ महाराज निकम यांचे कीर्तन होणार आहेत.
मंगळवार दि.१३ रोजी गणेश जयंती दिवशी सकाळी ६ ते ८ महाअभिषेक, सकाळी १० ते १२ गणेश जन्माचे कीर्तन, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ६ तनपुरेवाडी ते निघोज परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ७ ते ९ कीर्तन, रात्री ९ वाजता महाआरती, महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
शनिवार दि.१० ते सोमवार दि.१२ अष्टविनायक पालखी ज्योतयात्रा आयोजन करण्यात आले असून श्री क्षेत्र महड गणपती ते श्री क्षेत्र निघोज यामध्ये शेकडो भावीक सहभागी झाले आहेत. दि. १२ रोजी या यात्रेचे वरदविनायक मंदिर परिसरात जोरदार स्वागत होणार आहे. त्यानंतर विणापूजन होऊन अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे.