नेवासा – नेवासा तालुक्यातील झापवाडी येथील हरिनाम सप्ताहास दि.१३ पासून प्रारंभ होत आहे. हा सप्ताह १३ ते २० डिसेंबर या कार्यकाळात होणार असून, या यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्ताहाचा धर्म ध्वजारोहण माजी सभापती सुनील गडाख यांच्याहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सप्ताहात हभप कु.गायत्री घोडके आळंदी देवाची, रोहिदास महाराज हांडे, रामेश्वर महाराज राऊत, कैलासगिरी महाराज, उद्धव महाराज मंडलिक, शुभम महाराज कांडेकर, उमेश महाराज दशरथे यांचे रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तन होणार आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. प्रा.बाळासाहेब महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप वाटप केले जाणार आहे.