भरसभेत ‘हार्दिक पटेल’ यांना मारहाण

अहमदाबाद- पाटीदार समाजाचे नेते ‘हार्दिक पटेल’ यांना भाषण सुरु असतानाच एका अज्ञान व्यक्तीने कानशिलात लगावली आहे. गुजरातमधील सुरेंद्र नगरच्या वाढवालमधील बालदना या गावात हा प्रकार घडला आहे. हार्दिक यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रेवेश केला असून, ते गुजरातमधील काँग्रेस नेत्यांसाठी प्रचारसभा घेत आहेत.

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रेवेश केल्यानंतर काँग्रेसचे उमेदवारास निवडून देण्याचं आवाहन ते मतदारांना करत आहेत. त्यासाठीच हर्दिक पटेल आज, सुरेंद्र नगरच्या वाढवालमधील बालदना गावात प्रचार सभा घेत होते. त्याच वेळी स्टेजवर चढून एका अज्ञान व्यक्तीने हार्दिक यांच्या कानशिलात लगावली. यावेळी स्टेजवरील उपस्थित कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडून मंचावरच बेदम मारले आहे.

या घटने नंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून, अद्याप त्या व्यक्तीची ओळख जाहीर करण्यात आली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.