मोलकरणीचा पगार न दिल्याने, किम शर्माविरोधात गुन्हा

मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ‘किम शर्मा’ हिच्या विरोधात मुंबईतील खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिन्याभराचा पगार थकवून खोट्या आरोपात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप किमच्या मोलकरणीने (नम्रता सोळंकी) केला आहे.
त्यामुळे खार पोलीस पोलिसठाण्यात किम विरोधात मोलकरणीने गुन्हा दाखल केला आहे. नम्रता सोळंकी ही अनेक दिवसांपासून किमच्या घरी काम करत होती. किम शर्माने तिचा पगार दिला न्हवता. नम्रता सोळंकी हिने किमकडे आपल्या पगाराची मागणी केली असता, किमने तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. मात्र, नम्रताने पुन्हा किमकडे पगार मागितला असता, ‘पोलिसांकडे तुझी तक्रार करेन आणि तुला खोट्या प्रकरणात अडकवेल’ अशा भीतीदायक शब्दात किमने तिला धमकावल्याचा दावा मोलकरीने (नम्रता सोळंकी) केला आहे. या प्रकरणी नम्रताने खार पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.