मुंबई – अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर ही जोडी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे प्रसिद्धच्या झोतात आली. या मालिकेदरम्यानच त्यांचे प्रेम झाले आणि त्यांनी मागील वर्षी 2 डिसेंबर रोजी विवाह केला. त्यानंतर या जोडीने आपल्या पहिल्या सणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांच्या या फोटोला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता हार्दिक – अक्षयाच्या लग्नानंतरची पहिली मंगळागौरी साजरी करण्यात आली. याचे काही सुंदर फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हार्दिक – अक्षयाची लग्नानंतरची शाही मंगळागौर साजरा करण्यात आला आहे. यावेळी दोघांनी एकमेकांना मॅचिंग असा लुक केला होता. अक्षयाने या सोहळ्यासाठी खास सोनेरी रंगाची साडी नेसली होती. हार्दिकच्या नावाची मेहंदी, सोनेरी रंगाची साडी, हातात बांगड्या असा संपूर्ण शृंगार तिने केला होता. हार्दिकने बायकोच्या साडीच्या रंगाला मॅचिंग असा सदरा परिधान केला होता. या लुकमध्ये दोघेही फारच सुंदर दिसत असून त्यांचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस पडले आहेत.
याशिवाय अक्षयाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षयाच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसते. या मेहंदीत अक्षयाच्या हातावर महामृत्युंजय मंत्र काढलेला दिसत आहे. याशिवाय अक्षयाच्या हातावर ‘अक्षयाची मंगळागौर’ असं लिहिले दिसते.
View this post on Instagram
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हार्दिक जोशीने एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यानंतर सध्या तो ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अभिनय करत आहे.