जम्मू – पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वार्षिक अमरनाथ यात्रेत सामील होण्यासाठी देशभरातील साधू जम्मूमध्ये दाखल झाले आहेत. 200 हून अधिक साधू, जुन्या शहरातील पुराणी मंडई परिसरातील त्यांच्या पारंपरिक राममंदिर बेस कॅम्पवर पोहोचले आहेत.
अनंतनाग जिल्ह्यातील पारंपारिक 48 किमी नुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील 14 किमीचा बालताल मार्ग या दोन मार्गावरून 1 जुलै रोजी 62 दिवसांच्या यात्रेची सुरुवात होईल.
साधूंच्या गटासह यात्रेकरूंचा पहिला जथ्था 30 जूनला जम्मूहून यात्रेसाठी रवाना होत आहे. या यात्रेत हजारो भाविक सहभागी होणार असून त्यांच्या सुविधांसाठी विविध उपाययोजना करण्यात आली आहे.
तसेच सुरक्षेचाही चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी मोफत मदत छावण्या आणि लंगरही सुरू करण्यात येत आहेत.